'ते' झाड प्रवाशांच्या अंगावर केव्हा कोसळेल याचा नेम नाही...

राजेश सोळंकी
बुधवार, 11 जुलै 2018

आर्वी (वर्धा) : येथील बसस्थानकच्या मध्ये असलेले एक मोठे झाड केव्हा उन्मळून पडेल आणि केव्हा प्रवासी जखमी होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे हे झाड तोडण्याची विनंती बस आगाराच्या वाहतूक नियंत्रकाने वरिष्ठांना दोन वेळा पत्र देऊन केली आहे.

या बसस्टँडमध्ये अनेक वर्षांपासून एक झाड आहे ते ही मध्यभागी. हे झाड जुनाट असल्यामुळे आतुन पोखरलेले आहे. सध्या पावसाचे वादळ वाऱ्याचे दिवस आहे. जोरदार पाऊस किंवा वादळामुळे हे झाड केव्हा उन्मळून पडेल याची शाश्वती नाही.

या झाडाच्या खाली अनेक प्रवासी उभे असतात याच झाडाच्या खाली अनेक जण दुचाकी उभ्या करतात. बस लावताना किंवा मागे घेताना चालक वाहक यांना मोठा त्रास होतो. त्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. 

या बाबीचा सर्वतोपरी विचार करुन हे झाड तोडावे अशी विनंती वरिष्ठांकडे व संबंधित विभागाकडे वाहतूक नियंत्रक यांनी केली आहे .काही अघटित घडले? तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: tree fallen on people on st stand