घोट वनपरिक्षेत्रात 83 हेक्टरवर होणार वृक्ष लागवड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्याला यावर्षो 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत 50 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. असे असले तरी मनरेगातून करण्यात येणाऱ्या कामाचा निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. तरी वनविभागाने जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. एका घोट वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत जवळपास उदिष्टापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर जवळपास 86 हजार रोपाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती घोट वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे यांनी दिली.

चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्याला यावर्षो 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत 50 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. असे असले तरी मनरेगातून करण्यात येणाऱ्या कामाचा निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. तरी वनविभागाने जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. एका घोट वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत जवळपास उदिष्टापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर जवळपास 86 हजार रोपाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती घोट वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे यांनी दिली. घोट वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या निवेदनानुसार 83 हजार हेकटर क्षेत्रावर 72 हजार 300 वृक्ष लागवडीचे नियोजन आहे.

यात वाढ करून 125 हेकटर क्षेत्रावर 85 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या गावामध्ये वृक्ष लागवडीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या गावामध्ये वृक्षदिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी घोट येथे वृक्षदिंडीची निर्मिती करून वनपरिक्षेत्रातील पोतेपल्ली, मलकापूर, कोठरी, मक्केपल्ली, बोलेपल्ली, वेंगनूर व माडेआमगाव या गावामद्धे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार घोट वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी वनविकास यंत्रणा रोपवणाच्या भरीव कार्यक्रम संयुक्त व्यवस्थापन समिती, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, आदी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सामान्य नागरिकांसह सर्वच स्तरातील गणमान्य अधिकारी समुह सहभागी व्हावे असे आवाहन घोट वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे यांनी केले आहे.

Web Title: Tree plantation will be done on 83 hectares in the forest area