नक्षलवाद्यांकडून आदिवासी नागरिकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

गडचिरोली : काल (ता. 4) रात्री बाराच्या सुमारास पांडुरंग पदा (वय ४५, रा. होरेकसा ता. धानोरा जि. गडचिरोली) हे त्यांची पत्नी व मुलगी यांच्यासह त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना 8 ते 9 नक्षलवादी नक्षली वेषात व हातात बंदुका घेऊन  त्यांच्या घरी आले. त्यांनी बळजबरीने पांडुरंग पदा यांना सोबत चल अशी धमकी दिली. यावरून पांडुरंग यांच्या पत्नीने व मुलीने तुम्ही पांडुरंग यास कुठे घेऊन जात आहात? याबाबत विचारणा केली असता नक्षलवाद्यांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितले.

या दरम्यान पांडुरंग पदा यांची पत्नी व मुलीने आरडाओरड केली असता गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना पांडुरंग पदा यांना सोडून द्या असे सांगितले. गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता नक्षलवाद्यांनी पांडुरंग पदा यास सोबत जंगलात घेऊन गेले. काही वेळाने जंगलातून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने गावकरी त्या दिशेने गेले असता पांडुरंग पदा यांच्या छातीवर गोळी झाडून नक्षल्यानी त्यांचा निर्घृण खून केला होता.

नक्षलवाद्यांनी काहीही एक कारण नसताना एका गरीब आदिवासी कुटुंबाला लक्ष्य करत त्यांच कुटुंब उद्धवस्त केलं. नक्षल्यांनी खून केल्यामुळे पदा यांच्या पत्नी व मुलगी यांचा आधार हिरावला गेला असून कुटुंबाचा रोजी रोटीचा प्रश्न आ वासून समोर उभा ठाकला आहे.

Web Title: tribal citizen murdered by naxalites