आदिवासी वृद्धाची बॅंकेतच 10 हजारांची रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

मारेगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील घोगुलदरा येथील आदिवासी नागरिक लखमा कोंडेकर (वय 74) यांच्या मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक खात्यातून दहा हजारांची रोकड चोरट्याने मंगळवारी (ता. 26) लंपास केली.

मारेगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील घोगुलदरा येथील आदिवासी नागरिक लखमा कोंडेकर (वय 74) यांच्या मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक खात्यातून दहा हजारांची रोकड चोरट्याने मंगळवारी (ता. 26) लंपास केली.
लखमा कोंडेकर हे पैसे काढण्याकरिता मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक आले होते. त्यावेळी एका व्यक्तीस त्यांनी बॅंक खात्यातून 2 हजार रुपये काढण्यासाठी पावती भरण्याची विनंती केली होती. मात्र त्या व्यक्तीने विड्राल पावतीवर 10 रुपयांची रक्कम लिहिली. त्यानंतर रोखपाल यांच्याकडे पावती दिली. रोखपालांनी दहा हजार रुपये वृद्धास दिले. अनोळखी व्यक्तीने पैसे मोजून देतो, असे सांगून वृद्धास दुसऱ्या ठिकाणी नेले. साहेबांकडून आठ हजार परत बॅंकेत जमा करण्याकरिता सही घ्यावी लागते, असे सांगून त्याने रोकड खिशात घातली. त्यानंतर वृद्धास दुचाकीवर बसवून वर्दळीच्या ठिकाणी आणले. साहेबाची सही आणतो असे सांगून वृद्धास दुचाकीवरून उतरविले आणि चोरटा रोकड घेऊन लंपास झाला.
घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या लखमा यांच्याकडे अल्प शेती आहे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे 10 हजार रुपये रुपये वृद्धपकाळात उदरनिर्वाह करण्याकरिता जमा केले होते. घडलेल्या प्रकारची घोगुलदरा येथील सरपंच तुकाराम आस्वले यांच्या समक्ष पोलिसांत तक्रार दाखल केली. वृद्ध लखमा पोळा या सणाचा बाजारातून वस्तू खरेदी करण्यासाठी सोमवारी बॅंकेतून हजार रुपये काढण्याकरिता आले होते. अंधार पडला तरी लखमा घरी आले नाही. या कारणाने वृद्ध पत्नी चिंतातुर झाली होती. वृद्ध पत्नीने सरपंचांच्या घरी विचारणा केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal elder looted Rs 10,000 in bank