चला मधुरांगणसोबत सहलीला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नागपूर - रोजचे घरकाम, नोकरी करून कंटाळा आला असेल आणि थोडे रिफ्रेश  व्हायचे असेल तर महिलांसाठी सकाळ मधुरांगणच्या वतीने एक दिवसाची सहल आयोजित केली आहे. सहलीमध्ये सर्वांना स्विमिंग, बास्केटबॉल, टेनिस कोर्ट, ट्रेन राइड, वॉटर पार्क, एटीव्ही राइड्‌सचा आनंद लुटता येणार आहे. 

शनिवारी (ता.१६) ही सहल आयोजित केली आहे. काटोल मार्गावरील आयएमटी  कॉलेजजवळील क्‍लब अंबिका येथे सहल जाईल. सकाळ मधुरांगणच्या सदस्यांकरिता फक्त दीडशे रुपये तर इतरांना दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मुलांकरिता फक्त ५० रुपये शुल्क घेतले जाईल. यात एकवेळचे जेवण मोफत दिले जाणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा ही सहलीची वेळ असून, सकाळूेमतच्या रामदासपेठ येथील कार्यालयातून साडेनऊ वाजता बस निघेल. इच्छुकांना सहलीला येण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. याकरिता सकाळ कार्यालय, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ येथे हर्षाली दगडे (९५२७००४४५६) यांच्याशी संपर्क साधता येईल. 

Web Title: trip with Madhurangan