उभ्या असलेल्या ट्रकला आयसर ट्रकची धडक, एकाचा मृत्यू

सुरेंद्र चापोरकर
Wednesday, 16 September 2020

नागपूरच्या दिशेने ट्रक क्रमांक एमएच-14,इएम -8881 हा जात असताना तिवसानजीक या ट्रकच्या रेडीएटरच्या पाईपमध्ये बिघाड आल्याने तो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्याच दरम्यान सकाळी आठ वाजताच्या सुमारास मागून नागपूरच्या दिशेने भरधाव येणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच 40,एके-1534 हा ट्रक नादुरुस्त ट्रकवर जोरदार धडकला.

तिवसा (जि. अमरावती) :  बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तिवसा राष्ट्रीय महामार्ग पंचवटी चौकात उभ्या असलेल्या ट्रकला अमरावतीहून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच 40 एके 1534 या क्रमांकाच्या आयसर ट्रकने मागून जबर धडक दिली. यात ट्रकमधील क्लिनर जागीच ठार झाला असून, एक जण जखमी आहे.
 
सर्फराज महम्मद सैयद (वय 49, रा. नागपूर) असे मृताचे नाव असून, फिरोज बब्बू काजी हे जखमी झाले आहेत. चालत्या वाहनात झोपीची डुलकी आल्याने वाहनावरील  नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रकवर जाऊन आयसर ट्रक धडकल्यानी हा अपघात घडला यात ट्रकचा समोरील भाग पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

नागपूरच्या दिशेने ट्रक क्रमांक एमएच-14,इएम -8881 हा जात असताना तिवसानजीक या ट्रकच्या रेडीएटरच्या पाईपमध्ये बिघाड आल्याने तो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्याच दरम्यान सकाळी आठ वाजताच्या सुमारास मागून नागपूरच्या दिशेने भरधाव येणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच 40,एके-1534 हा ट्रक नादुरुस्त ट्रकवर जोरदार धडकला. ज्यामुळे ट्रक हा क्लिनर साईडने धडकल्याने त्यातील क्लिनर सर्फराज (वय 49, रा नागपूर) जागीच ठार झाला. चालक फिरोज बब्बू काजी (वय 40, रा नागपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A truck collides with a standing truck, one killed