ट्रकचालकाला अमानुष मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

वाडी (जि. नागपूर) : माल वेळेवर पोहोचविण्यास अयशस्वी ठरलेल्या ट्रकचालकाला मालकाने उलटे लटकविले व नग्न करून अमानुष मारहाण केली. बेशुद्ध झालेला ट्रकचालक शुद्धीवर आल्यावर त्याला याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वडधामना येथे घडली. व्हॉट्‌सऍपवर मारहाणीची क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

विक्की आगलावे (वय 28, रा. कळंबी, ता. कळमेश्‍वर) असे ट्रकचालकाचे नाव आहे. वाडी पोलिसांनी ट्रान्सपोर्ट मालक व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विक्की आगलावे हा एका ट्रान्सपोर्टरकडे ट्रकचालक म्हणून काम करतो. 24 जुलैला चालक विक्कीने लॉजेस्टिक डेपोमधून सामान ट्रकमध्ये भरले. हा ट्रक त्याला केरळमध्ये पोहोचवायचा होता. परंतु, विक्कीला बरे वाटत नसल्याने त्याने ट्रक वाडीपर्यंत आणला. काही वेळ आराम केल्यावर त्याने दारू पिली. तो दोन दिवस वाडीतच होता.
ट्रान्सपोर्ट मालकाला ही बाब कळताच विक्कीचा शोध घेऊन दोन दिवसांनंतर शनिवारी (ता. 27) त्याला कार्यालयात आणले. विक्कीला विचारपूस केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने साथीदारांसह विक्कीला दोरीने बांधून नग्नावस्थेत लटकविले. लाकडी दांड्याने व पट्ट्याने जबर मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अमानुषपणे विक्कीच्या ढुंगणात दांडू कोंबला. याचे चित्रीकरणही त्याच्या साथीदाराने केले. मारहाणीमुळे विक्की बेशुद्ध झाला. वाडी पोलिसांनी ट्रकचालकाला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truck driver was brutally assaulted