विदर्भात मंगळवारपासून पुन्हा मुसळधारेची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : जवळपास पंधरा दिवस वरुणराजाने झोडपून काढल्यानंतर विदर्भात मंगळवारपासून पुन्हा जोरदार पावसाची दाट शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने तसा इशारा दिलेला आहे.

नागपूर : जवळपास पंधरा दिवस वरुणराजाने झोडपून काढल्यानंतर विदर्भात मंगळवारपासून पुन्हा जोरदार पावसाची दाट शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने तसा इशारा दिलेला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो विदर्भाच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पुढील 48 तासांनंतर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. विशेषत: नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात झालेल्या संततधारेमुळे पावसाची तूट बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आहे. यवतमाळ व वाशीमचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. धरणांची स्थिती मात्र अजूनही चिंताजनकच आहे. केवळ इरई व नांद धरणांमध्येच बऱ्यापैकी जलसाठा जमा झाला आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह येथील पेंच धरणात अजूनही ठणठणाट आहे. मागील दोन दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Tuesday in Vidarbha Possibility of recurrence