सावधान! म्हणताच झाला अक्षतांचा वर्षाव 

 कामठी ः तुळशीविवाह सोहळ्यास जमलेले नागरिक.
कामठी ः तुळशीविवाह सोहळ्यास जमलेले नागरिक.

कामठी (जि.नागपूर) ः हार व फुलांनी सजवलेल्या तुळशी वृंदावनासमोर पाटावर ठेवलेली बाळकृष्णाची लोभस मूर्ती. तुळशी आणि पाट यांच्यामध्ये धरलेला अंतरपाट. मंगलाष्टकांचा सुरू असलेला मंगलमय गजर. अन्‌ शुभमंगल सावधानची हाळी उमटताच तुळशी व बाळकृष्णांवर अक्षतांचा झालेला वर्षाव. गोरज मुहूर्तावर या मंगलमय वातावरणाने महावीरनगर रनाळा प्रफुल्लित झाले होते. निमित्त होते तुळशीविवाह सोहळ्याचे. 

अन्‌ तुळशी विवाहाचा उडाला बार 
रनाळा येथील महावीरनगर परिसरात श्री.ठाकरे यांच्या घराशेजारी कार्तिक शुक्‍ल 13 तृतीयेस सांस्कृतिक कार्यक्रम व तुळशीविवाह गोरज मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी बाळकृष्णाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर तुळशी आणि बाळकृष्णाचा विवाहसोहळा झाला. यावेळी आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. गावातील पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले. विशेष म्हणजे, या सोहळ्यात सामूहिक तुळशीचे लग्न विधिवत लावण्यात आले. मंगलाष्टके म्हणण्यात आली. यामुळे विवाहसोहळ्याची रंगत द्विगुणित झाली होती. तुळशीविवाहासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी कुमकुम, हळदी, मेहेंदी, मायरा, विनायक आणि संगीतसंध्या कार्यक्रम झाले. महिलांनी पारंपरिक खेळांचा आनंद घेतला.
 

तुळशीविवाहानंतर विधिवत होम करण्यात आला. तसेच पुष्पांनी सजवलेल्या डोलीमधून तुळशीची अखेर बिदाई करण्यात आली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संयोजन श्री. ठाकरे आणि रंजना ठाकरे यांनी केले.या विवाहाची चर्चा सदया पंचक्रोशित गाजत आहे. यावेळी गजेंद्र वंजारी, सतीश बेलेकर, गंगाधर पिंदरले, सागर मदनकर, सुदर्शन लसंते, गोविंदा दाडे, बाल्या ठाकरे, गोपालराव वसंतकर, किशोर बाला, सर्वेश पौनिकर, जगदीश चौधरी, अक्षय खोपे, डॉ. अश्विनी बोरकर, कुमारन पिल्लै, क्रिसन पिल्लै, प्रकाश ससनकर, डॉ. संजय शेंद्रे आणि समस्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com