वनविभागाकडून शेतकऱ्यांना तुतीची रोपे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

चंद्रपूर : वनविभागाने शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. 17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा होणार आहे. तब्बल 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे निमित्त साधून वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात वनमहोत्सव राबविण्यात येत आहे. 2017 पासून 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत 2019-20 या वर्षांसाठी 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

चंद्रपूर : वनविभागाने शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. 17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा होणार आहे. तब्बल 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे निमित्त साधून वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात वनमहोत्सव राबविण्यात येत आहे. 2017 पासून 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत 2019-20 या वर्षांसाठी 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. खासगी मालकीचे पडीक क्षेत्र, शेतीचे बांध, कालवा, रस्ता, सामूहिक पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. याशिवाय सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमींना अल्पदरात रोपे उपलब्ध करून देण्यात आले होते. विशेष म्हणजे सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत तुतीचा रोपे तयार करण्यात आली आहेत. ही रोपे रेशीम विभागाला मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम विभागामार्फत या रोपांचा पुरवठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केला जाणार आहे. जिल्ह्यात तुरी लागवडीचे क्षेत्र सद्यःस्थितीत अतिशय अल्प आहे. या निर्णयामुळे लागवड क्षेत्र वाढू शकेल याकरिता रेशीम विभाग, सामाजिक वनीकरण व वनविभाग संयुक्त प्रयत्न करीत आहे.
आठपासून 40 रुपयांपर्यंतची रोपे
यंदा एक महिन्याच्या रोपाकरिता महोत्सव कालावधीत प्रती रोप 8 रुपये, तर 18 महिन्यांच्या रोपाकरिता 40 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuti plants to farmers from forest department