Vidhan Sabha 2019 : बाराही मतदारसंघांत प्रशासन सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर : जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. 

नागपूर : जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. 
नागपूर ग्रामीणमधील काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी, रामटेक तर शहरातील दक्षिण-पश्‍चिम, दक्षिण, पूर्व, मध्य, पश्‍चिम व उत्तर नागपूर मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर सकाळी उद्या 7 वाजतापासून मतदानास प्रारंभ होणार आहे. शहरातील सहा मतदारसंघांत 2,049 तर ग्रामीण भागातील 6 मतदारसंघांत 2,363 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 55 मतदान केंद्रे संवेदनशील असून येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात 10 टक्के संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 336 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. प्रतिमतदारसंघ एक केंद्र सखी मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व केंद्रावर मतदानासाठी आवश्‍यक साहित्य जीपीएस लावण्यात आलेल्या वाहनाने आज रात्री उशिरापर्यंत पाठविण्यात आले. यात ईव्हीएम मशीन सोबत मतदारयाद्या, पाणी, टेबल खुर्ची आदींचा समावेश आहे. उन्हापासून बचावासाठी मतदान केंद्रावर मंडप-शेड टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना निवडणूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या कामात 17 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. मतदानाच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात आले आहे. बाराही मतदारसंघांतील 41 लाख 71 हजार 420 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 21 लाख 34 हजार 932 पुरुषांचा तर 20 लाख 36 हजार 389 महिला मतदार आहेत. जिल्ह्यात 99 तृतीयपंथीही मतदानाची हक्क बजावतील. दरम्यान, हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. पंधरा दिवसांपासून प्रशासन मतदानाबाबत जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे सांगितले. शिवाय पावसाचे सावट असल्याने घराघरांतून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध राजकीय पक्ष, उमेदवारांचे कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत. मतदार केंद्रावर प्राथामिक आरोग्य केंद्राची सुविधादेखील उपलब्ध राहणार आहे. यासर्व केंद्रांवर मेडिकल किट उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, पॅरासिटामोल टॅबलेट, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध राहणार असून ऍम्बुलन्सची सोयही करण्यात आली आहे. 

मतदार संघनिहाय बूथ व मतदारांची संख्या 
1) दक्षिण-पश्‍चिम 
- मतदान केंद्र ः 372 
- मतदार ः 3 लाख 84 हजार 094 
2) दक्षिण 
- मतदान केंद्र ः 344 
- मतदार ः 3 लाख 82 हजार 338 
3) पूर्व 
- मतदान केंद्र ः 366 
- मतदार ः 3 लाख 71 हजार 893 
4) मध्य 
- मतदान केंद्र ः 305 
- मतदार ः 3 लाख 24 हजार 158 
5) पश्‍चिम 
- मतदान केंद्र ः 332 
- मतदार ः 3 लाख 62 हजार 274 
6) उत्तर 
- मतदान केंद्र ः 360 
- मतदार ः 3 लाख 84 हजार 595 
7) काटोल 
- मतदान केंद्र ः 328 
- मतदार ः 2 लाख 718 हजार 93 
8) सावनेर 
- मतदान केंद्र ः 366 
- मतदार ः 3 लाख 10 हजार 729 
9) हिंगणा 
- मतदान केंद्र ः 434 
- मतदार ः 3 लाख 76 हजार 636 
10) उमरेड 
- मतदान केंद्र ः 384 
- मतदार ः 2 लाख 84 हजार 657 
11) कामठी 
-मतदान केंद्र ः 494 
- मतदार ः 4 लाख 39 हजार 875 
12) रामटेक 
- मतदान केंद्र ः 357 
- मतदार ः 2 लाख 78 हजार 279 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve Constituency Administration Ready