काय म्हणाव याला? कामाचा फारसा अनुभव नव्हता म्हणून घडला असा प्रकार...

Twenty five hectares of land has not been planted
Twenty five hectares of land has not been planted

चुनाळा (जि. चंद्रपूर) : रूपापेठ येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने कक्ष क्रमांक 186 मधील 25 हेक्‍टर जागेत 2018 मध्ये सागजडी रोपवणाची लागवड केली होती. वृक्षलागवडीसह अन्य कामावर मंजूर 10 लाख 86 हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु, आता वृक्षारोपण केलेले एकही वृक्ष जिवंत नसल्याने परिसर बकाल झाल्याचे चित्र आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला. बोगस मजूर दाखवून रक्कम हडपण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

वनसडी वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत रूपापेठ येते. रूपापेठ येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या हद्दीत कक्ष क्रमांक 186 आहे. या कक्षामध्ये सागजडीचे वृक्षारोपण करण्यासाठी 2018 मध्ये वनविभागाकडून 10 लाख 86 हजार रुपये मंजूर करण्यात आले. या मंजूर निधीतून भूमापन सीमांकन, उपचार नकाशा, सब जलाई, कटाई, दगडी पाळ, सागजडी लागवड, निंदण अशी अनेक कामे करणे अपेक्षित होते. मात्र, सागजडी वृक्षारोपणाव्यतिरिक्त अन्य कामे केवळ कागदोपत्री दाखविण्यात आली. हा सर्व प्रकार संगनमतातून झाला. लाखो रुपये खर्चून लागवड केलेल्या सागजडी लागवडीचे अवघ्या तीन-चार महिन्यांतच तीनतेरा वाजले.

हजारो सागजडीचा वृक्ष नष्ट झाली. मात्र, सर्व कामे झाल्याचे दाखवून निधीची उचल करण्यात आली. रोपाभोवती निंदण करून मातीचा भर घातला नसतानाही दुसरे व तिसरे निंदण बोगस मजुरांच्या नावे दाखवून परस्पर रक्कम हडप केल्याची चर्चा आहे. तर दगडी पार रचण्यासाठी प्रत्यक्षात अनेक मजुरांनी काम केले नसतानादेखील त्यांची नावे दाखवून रकमेची उचल केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 

चौकशी करण्याची मागणी

लागवड केलेली बहुतांशी झाडे अस्तित्वात नसतानाही बोगस मजूर दाखवून लाखोंचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे सदर कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने कामावरील सर्व मजुरांचे बयाण नोंदविल्यास प्रकरणातील सत्यता समोर येऊ शकते. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कामाचा फारसा अनुभव नव्हता 
संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद मिळाले. या कामाचा फारसा अनुभव नव्हता. या कामात बोगस मजूर दाखवून रकमेची उचल केल्याची बाब उशिरा निदर्शनास आली. 
- मनोज तुमराम, 
अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, रूपापेठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com