दूध भुकटीला 20 टक्के प्रोत्साहन अनुदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नागपूर : दूध उत्पादकांना दर वाढवून मिळण्यासाठी केंद्र सरकारने दूध भुकटीसाठी 20 टक्‍के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यासोबत दुग्धजन्य पदार्थ व दूध पावडरवर 40 टक्‍के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दूधदर वाढवून देण्यासाठी राज्य सरकारने दूध भुकटी उत्पादकांसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. तसेच मध्यान्ह भोजन, तसेच इतर शासकीय योजनांत भुकटी देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे 21 जुलैपासून 3 रुपये तर नंतर 2 रुपये वाढविण्याचे काही खासगी, सरकारी दूध संघांनी जाहीर केले आहे. यासंबंधाने विधिमंडळात तीनवेळा चर्चा झाली आहे. मात्र, निर्णय झाला नव्हता. काही निर्णय केंद्र सरकारशी संबंधित होते. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासंबंधाने निर्णय घेण्यासाठी नागपूर अधिवेशनात आले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात ही बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासह विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

Web Title: twenty percent subsidy for milk powder production