esakal | लॉकडाउनमध्ये नागपुरात २२ हजार नवीन वीजजोडणी; विदर्भात ७१ हजार
sakal

बोलून बातमी शोधा

twenty two thousand new power connections in Nagpur in lockdown

महावितरणकडून नवीन वीजजोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांना www.mahadiscom.in या महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाईल ॲपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करता येईल.

लॉकडाउनमध्ये नागपुरात २२ हजार नवीन वीजजोडणी; विदर्भात ७१ हजार

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : कोरोनाच्या संकटात लॉकडाउन करण्यात आल्याने सर्वच व्यवहार बंद होते. लॉकडाउन दरम्यान महावितरणने राज्यातील दोन लाख २२ हजार १७१ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली. याच काळात विदर्भातील एकूण ७१ हजार ४२५ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. त्यात नागपूर परिमंडळातील सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांचाही समावेश आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाउन झाले. सर्वत्र संचारबंदी असतानाही सर्व खबरदारी घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कार्य केले. त्याच दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नवीन वीजजोडणी हवी असणाऱ्या ग्राहकांना तातडीने यंत्रणा उभारून वीज जोडणी देण्याचेही कार्य केले. राज्यात १ एप्रिल ते २९ सप्टेंबर या काळात विविध योजनेतून दोन लाख २२ हजार १७१ नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली.

अधिक माहितीसाठी - अंडी, चिकनमध्येच नाही तर या दहा गोष्टीतूनही मिळते प्रोटीन; जास्त ताकदीसाठी करा सेवण

विदर्भात नागपूर परिमंडळात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना, अकोला १३ हजार ९३७, अमरावती १४ हजार ८११, औरंगाबाद १४ हजार ३९०, बारामती २४ हजार ५३७, भांडूप १८ हजार २५९, चंद्रपूर १० हजार २७०, गोंदिया ९ हजार ८७२, जळगाव १६ हजार ६२१, कल्याण ३१ हजार २०५, कोकण ७ हजार ५१०, कोल्हापूर २० हाजर २०२, लातूर १५ हजार ६६२ आणि नांदेड परिमंडळात २ हजार ३६९ नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली.

प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन

महावितरणकडून नवीन वीजजोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांना www.mahadiscom.in या महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाईल ॲपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करता येईल.

संपादन - नीलेश डाखोरे