esakal | प्रेयसीच्या इच्छेविरुद्ध केला दोन वेळा गर्भपात; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime

प्रेयसीच्या इच्छेविरुद्ध केला दोन वेळा गर्भपात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : प्रेयसीच्या इच्छेविरुद्ध युवकाने दोनवेळा तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप युवतीने भातकुली पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत केला. त्यावरून पोलिसांनी संशयित आरोपी इम्रान शहा (रा. ताजनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इम्रान शहा याची युवतीसोबत ओळख झाली. ओळखीनंतर प्रेमप्रकरण सुरू झाले. इम्रान याने प्रेयसीला जून २०२० मध्ये भातकुली तालुक्यात असलेल्या एका गावातील त्याच्या स्वत:च्या शेतात नेले. तेथे पीडितेशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला असता युवतीने त्याला नकार दिला. युवतीच्या नकारानंतर तिचे मन वळविण्यासाठी त्याने लवकरच लग्नही करू असे सांगितले.

हेही वाचा: फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

त्यानंतर स्वत:च्या शेतासह इतरही ठिकाणी पीडितेला फिरवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे पीडितेला दोनवेळा गर्भधारणा झाली. प्रकरण आपल्या अंगलट येईल या भीतीने इम्रान शहा याने दोन्ही वेळी प्रेयसीचा तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून घेतला. पीडितेने आधी गाडगेनगर ठाण्यात तक्रार केली होती. प्रकरण भातकुली ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पुढील तपास भातकुली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

loading image
go to top