वृद्धेच्या हत्याकांडाचा पर्दाफाश दोन आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नागपूर - लूटमार करण्याच्या उद्देशाने दोन मजुरांनी वृद्धेचा कैचीने हल्ला करून खून केला होता. या हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना अटक केली. शिवा आणि प्रवीण (रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.

नागपूर - लूटमार करण्याच्या उद्देशाने दोन मजुरांनी वृद्धेचा कैचीने हल्ला करून खून केला होता. या हत्याकांडात गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत आरोपींना अटक केली. शिवा आणि प्रवीण (रा. गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत.

शशिकला ठाकरे (वय 60, रा. सक्‍करदरा पोलिस स्टेशनसमोर) यांचा सोमवारी घरात घुसून प्रवीण आणि शिवा या दोघांनी कैचीने हल्ला करून खून केला होता. हे हत्याकांड लूटमारीच्या उद्देशाने घडल्याचे समोर आहे. शशिकला यांच्या घराशेजारी असलेल्या बांधकामावर ते मजुरी करायचे. त्यांची नजर घरी एकट्या असलेल्या शशिकला यांच्यावर गेली. एकाने शशिकला यांचे तोंड दाबले तर दुसऱ्याने वृद्धेच्या गळ्यावर कैचीने वार करीत ठार केले. शशिकला यांचा खून केल्यानंतर आरोपींनी लगेच घरात शोधाशोध केली. घरात हातात आले तेवढे घेऊन त्यांनी पळ काढला. दोघांनीही सोमवारी सायंकाळी गोंदिया गाठले. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना गोंदियातून अटक केली.

सीसीटीव्ही फुटेजवर ओळख
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी वृद्धेच्या घरात घुसताना आणि बाहेर निघून जाताना दिसत आहेत. त्यामुळे मारेकऱ्यांची संख्या लक्षात आली. रेतीचे कामे सुरू असल्यामुळे बांधकाम मजुरांवर पोलिसांचा संशय होता. वर्णनावरून माहिती काढताचे ते प्रवीण आणि शिवा असल्याचे लक्षात आले.

Web Title: two accused were arrested in the killings expose the elderly