बुलडाणा : गुप्तधन व बालिकेच्या नरबळी प्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

सारशिव ता. मेहकर येथे शाम वासुदेव मोतेकर याने त्याच्या वडीलांच्या नावे असलेल्या गढीच्या जुन्या जागेत घरातील आतिल खोलीत आरोपी विष्णू ज्ञानेश्वर वाळूकर रा.सावरखेड ता.चिखली व अधिक दोन अशा चौघांनी मिळून गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने खड्डा खोदून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न केला.

जानेफळ (बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील सारशिव येथील गाजत असलेल्या गुप्तधन व बालीकेचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी शाम वासुदेव मोतेकर व विष्णू ज्ञानेश्वर वाळूकर यांच्यासह चौघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन पैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

17 मे रोजी दूपारी साडेचारच्या दरम्यान सारशिव ता. मेहकर येथे शाम वासुदेव मोतेकर याने त्याच्या वडीलांच्या नावे असलेल्या गढीच्या जुन्या जागेत घरातील आतिल खोलीत आरोपी विष्णू ज्ञानेश्वर वाळूकर रा.सावरखेड ता.चिखली व अधिक दोन अशा चौघांनी मिळून गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने खड्डा खोदून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न केला. चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपींंनी खोदून बुजलेला खड्डा उकरून पाहीला असता त्यामध्ये निंबु, कापडी बाहूली,ज्वारीचे दाणे आदी साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे अप.नं.१०५/२०१९ कलम ३(३)महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्याबाबद व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबदचा अधिनियम२०१३नुसार कार्यवाही करण्यात येऊन आरोपी शाम वासुदेव मोतेकर रा.सारशिव ता.मेहकर व विष्णु ज्ञानेश्वर वाळूकर रा.सावरखेड ता.चिखली या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुढील अधिक तपास पो. नि. आत्माराम प्रधान, ठाणेदार गौरीशंकर पाबळे, पो.उ.नि.राजु राऊत, रायटर शरद बाठे,पो.हे.काँँ.गणेश डव्हळे आदि करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested for murder case in Buldhana