चिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग

जितेंद्र सहारे 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी संस्कार बरगये आणी प्रथम लांडगे आपला बल्ला फिरवुन चमक दाखविणार असल्याची माहीती गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी दिली.

चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी संस्कार बरगये आणी प्रथम लांडगे आपला बल्ला फिरवुन चमक दाखविणार असल्याची माहीती गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी दिली.

अंध शालेय विद्यार्थामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्याच्या उद्देशाने राज्य, देश आणी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या करीता देश व राज्य पातळीवर अंधाकरीता क्रीकेट असोसिएशन कार्यरत आहेत .क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लॉइंड ऑफ महाराष्ट्र आणी अमरावती येथील भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेद्वारा विभाग स्तरीय अंध शालेय क्रीकेट स्पर्धा  १ आक्टोबंर ते २ आक्टोंबर या दरम्यान आयोजीत करण्यात आली असुन, याकरीता जिल्हा क्रीकेट टीम तयार करण्या संबधीचे पत्र प्रत्येक जिल्हा परीषद शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा परीषद सर्व शिक्षा अभियान समवेशीत शिक्षण अंतर्गत काम करणाऱ्या तज्ञा कडून विद्यार्थांचि नावे मागवुन त्याप्रमाणे १४ विद्यार्थांची टिम तयार करण्यात आली .

विदर्भ स्तरीय क्रिकेट स्पर्धे करीता जिल्ह्यातील रितेश शेषराव पंधरे, वसंतराव नाईक विद्यालय. कोरपना, धिरज वंसत मगर, इंदीरा गांधी विद्यालय पालेबारसा, ता .सावली, रोहीत गजानन साळवे, जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा बामणी, ता.बल्हारपुर, उमर फारूख शेख कुरेशी, नगर परीषद गांधी विद्धालय, बल्हारपुर, दादु उमेश मावलीकर, शिवाजी हायस्कुल चुनाळा, ता . राजुरा, पराग दामोधर दासशेट्टीवार, जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा दुर्गापूर ( w.c .L ), ता. चंद्र्पूर, नागेश रविंद्र पारधी, इंदिरा गांधी ग्रामीण विद्यालय पांढरकवळा, ता .चंद्रपूर, टेकेश्वर महेंद्र येरमे, महात्मा गांधी फुले विद्यालय घाटकुळ, ता .पोंभुर्णा, अविश्कार तोताराम सहारे, निरूपा विद्यालय रुई, ता.ब्रम्हपुरी, मित मनोज पत्रे, नेवजाबाई हितकारणी मुले विद्यालय. ब्रम्हपुरी, आदीत्य रविंद्र हांडेकर, लोक विद्यालय तळोधी, ता. नागभिड, संस्कार श .बरगये, न्यु. राष्ट्रीय विद्यालय चिमूर, प्रथम राजु लांडगे, नेहरू विद्यालय चिमूर, संकेत सुभाष गोलावार, भारत विद्यालय नवरगाव, ता. सिंदेवाही या चौदा अंध विद्यार्थांची निवड जिल्ह्याच्या चमु मध्ये करण्यात आली आहे.

अमरावतीला होणाऱ्या विदर्भस्तरीय अंध शालेयक्रीकेट स्पर्धे करीता विद्यार्थाना तालुक्यातील नियुक्त समावेशीत शिक्षण तज्ञ २९ स्टेबंरला जिल्हा स्तरावर घेऊन जातील. तिथुन नियुक्क चार सदस्यीय टिम त्यांना स्पर्धे करीता अमरावतीला घेऊन जातील. आणी परत ३ आक्टोबरला त्यांना त्यांचे घरी सुखरूप पोहचविल्या जाईल.
- किशोर पीसे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समीती चिमूर

अंध विद्यार्थांची देखभाल प्रशिक्षण आणी आरोग्याची जबाबदारी सर्व शिक्षण अभियानाचे जिल्हा समन्वयक पी.एस. राठोड, राजेंद्र हिवरे, प्रकाश कोटनाके चंद्रपूर तसेच भद्रावती येथील राजेश कोहळे या चार कर्मचाऱ्यांची समीती सांभाळणार असुन, तशा सुचणा त्यांना शिक्षण अभिकाऱ्या कडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: Two blind students from Chimur taluka are batting in competition