दोन बांधकाम व्यावसायिकांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नागपूर - कराची चोरी केल्याच्या संशयावरून ओम शिवम बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि डी. पी. जैन समूहाच्या सात प्रतिष्ठांनासह निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापे टाकले. दहा ठिकाणी चौकशी केली जात असून अद्याप अघोषित संपत्ती किती प्राप्त झाली याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. मात्र, संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे सापडल्याची माहिती आहे. 

ओम शिवम बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या देवनगर येथील कार्यालय, पांडे ले-आउटमधील निवासस्थान आणि चिंचभुवन येथील 15 एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या शिव एलाइट प्रकल्पाच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. संचालक चंद्रशेखर कापसे आहेत. या समूहाने चार प्रकल्प पूर्ण केले असून पाच नवीन प्रकल्पांचे बांधकाम करणार असल्याची माहिती आहे. 

डी. पी. जैन ऍण्ड कंपनी इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विमानतळावरील हॅंगर, रस्ते कंत्राटदार, सिंचन प्रकल्प, पायाभूत सुविधा, बांधकाम क्षेत्रासह आघाडीच्या कंपन्यांचे पोट कंत्राटदार म्हणूनही काम करतात. यामुळे ज्या कंपन्यांचे पोट कंत्राटदार म्हणून काम करतात. त्या कंपन्यांवरही कारवाई होण्याची शक्‍यता आहे. जैन यांच्या अमरावती रोड येथील कार्यालय आणि निवासस्थान, दिल्ली, कोलकता आणि भोपाळ येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अघोषित संपत्तीची संशयास्पद कागदपत्रे सापडल्याची माहिती आहे. तसेच काही लॉकर्सही आढळले आहेत. दीपक जैन, गिरीश जैन हे दोन संचालक असून निर्मल अग्रवाल, संजय जैन आणि गुप्ते हे त्यांचे सनदी लेखापाल आहेत. त्यांच्याही कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. 

100 कर्मचाऱ्यांचा समावेश 

प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी सात वाजता अचानक सात ठिकाणी छापे आणि दहा ठिकाणी चौकशीच्या कारवाईस सुरुवात केली. त्यात सरासरी 100 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. उद्या बुधवारपर्यंत कारवाई सुरू राहण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Two builders impressions