Gram Panchayat Result : दोन वर्षीय चिमुकलीने काढली ईश्वरचिठ्ठी अन् दोन उमेदवारांचे उजाळले भाग्य

बबलू जाधव
Monday, 18 January 2021

उमेदवार शेख मूज्जफर  इसाक यांना 186 मते, तर दुसरे उमेदवार सुरेश पेंदोर यांना 185 व एक टपाल मतदान, असे एकूण 186 मतदान मिळाली होती.

आर्णी (जि. यवतमाळ ) : तालुक्यातील तळणी येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रंमाक दोन मधील दोन उमदेवारांना सारखी मते पडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आर्णी तहसीलदार परसराम भोसले यांनी दोन वर्षीय चिमुकलीच्या हाताने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यामधून एकाला विजयी घोषित करण्यात आले.

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

उमेदवार शेख मूज्जफर  इसाक यांना 186 मते, तर दुसरे उमेदवार सुरेश पेंदोर यांना 185 व एक टपाल मतदान, असे एकूण 186 मतदान मिळाली होती. दोन्ही उमेदवारांना 186 मते मिळाली. त्यानंतर तहसीलदार परसराम भोसले यांनी दोन वर्षीय चिमुकली लक्ष्मी अमोल पुरी हिच्या हाताने ईश्वरचिठ्ठी काढली. यात शेख मूज्जफर इसाक यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

शिरपूर येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रंमाक तीनचे उमेदवार पवन राठोड विजयी -
तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार देवराव राठोड यांना 169 मतदान, तर  पवन राठोड यांना ही 169 मते मिळाली. या जागेसाठी लक्ष्मी पुरी हिने ईश्वर चिठ्ठी काढली. यात पवन राठोड यांना विजयी घोषित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two candidate won by in two grampanchayat of arni of yavatmal