25 फूट उंचीवरच्या दोरीवरून चालत होती ती...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

पोलिस व चाईल्ड लाइनच्या सदस्यांनी मुलीला सुरक्षित खाली उतरून डोंबाऱ्याचा खेळ थांबविला व ज्यांनी मुलांच्या डोंबारी खेळाचे आयोजन केले ते चिमुकल्यांचे भाऊ गोपीनाथ राजू नट व शिवाशी नट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व चाईल्डलाइन पदाधिकाऱ्यांनी मुलांचे समुपदेशन केले. हे चिमुकले दोन दिवसांआधीच त्यांच्या भावासोबत बिलासपूर छत्तीसगड येथून डोंबारी खेळ करण्यासाठी अमरावतीला आले होते.

अमरावती : अल्पवयीन मुलांकडून धोकादायक पद्धतीने डोंबारी खेळ दाखवून पैसे कमविणाऱ्याच्या ताब्यातून दहा वर्षांची मुलगी आणि बारा वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका केली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या हालचाली चाईल्ड लाइनने सुरू केल्या आहेत.
येथील प्रभात सिनेमा गृहासमोरील चौकात ही कारवाई केली. चाईल्ड लाईन समन्वयक अमित कपूर यांनी शहर कोतवाली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी 10 वर्षांची मुलगी 25 फुटांच्या लांब बांबूवर बांधलेल्या दोरीवरून सुरक्षा नसताना चालताना आढळली व 12 वर्षांचा मुलगा त्यावर ढोलकी वाजून उपस्थितांचे मनोरंजन करताना दिसले.

सविस्तर वाचा - प्रियकराचा जीव वाचविण्यासाठी प्रेयसीने फोडला हंबरडा

पोलिस व चाईल्ड लाइनच्या सदस्यांनी मुलीला सुरक्षित खाली उतरून डोंबाऱ्याचा खेळ थांबविला व ज्यांनी मुलांच्या डोंबारी खेळाचे आयोजन केले ते चिमुकल्यांचे भाऊ गोपीनाथ राजू नट व शिवाशी नट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व चाईल्डलाइन पदाधिकाऱ्यांनी मुलांचे समुपदेशन केले. हे चिमुकले दोन दिवसांआधीच त्यांच्या भावासोबत बिलासपूर छत्तीसगड येथून डोंबारी खेळ करण्यासाठी अमरावतीला आले होते.
ही मुले शिक्षणापासून वंचित असून सद्य:स्थितीत बेनाम चौक साईनगर अमरावती येथे राहत असल्याचे समजले. संचालक प्रा. डॉ. सूर्यकांत पाटील, उपसंचालक प्रा. प्रशांत घुलक्षे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शहर कोतवालीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे, पोलिस शिपाई जुनेद खान, आशिष विघे, चाईल्ड लाइन केंद्र समन्वयक अमीत कपूर, समुपदेशक फाल्गुन पालकर, टीम मेंबर शंकर वाघमारे, मीरा राजगुरे, सरिता राऊत, पंकज शिनगारे, अजय देशमुख, सुरेंद्र मेश्राम, चेतन वरठे, यांनी मोलाचे कार्य व पाठपुरावा केला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two child labour released from acrobat