esakal | पोहणे बेतले जिवावर; खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पोहणे बेतले जिवावर; खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू

पोहणे बेतले जिवावर; खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देवडी (जि. वर्धा) : येथील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या मोठ्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षांच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तुषार अनिल शेळके (वय १३) व उबेद अली असिफ अली (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. (Two-children-die-after-falling-into-a-ditch-in-wardha-district-nad86)

प्राप्त माहितीनुसार, खाडे ले-आऊटमध्ये काळा पूल परिसरात तुषार अली हे दोघे काही मित्रांसोबत पोहण्यासाठी गेले होते. खड्ड्यात पाणी कमी असेल असा अंदाज लावून उड्या घेतल्या. पोहता येत नसल्याने व खड्डा खोल असल्याने दोघेही बुडू लागले. दोघांना बुडताना पाहून इतर मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. मुले परिसरातून आरडाओरड करीत जात असल्याचे पाहून नागरिकांनी खड्ड्याकडे धाव घेतली.

हेही वाचा: बोंबला! निकालाचे संकेतस्थळच ‘क्रॅश’; विद्यार्थ्यांची धावपळ

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालय नेले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले. खड्डा खोदणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. याप्रकरणी देवळी पोलिस पुढील तपास करीत आहे.

(Two-children-die-after-falling-into-a-ditch-in-wardha-district-nad86)

loading image