खड्ड्यात बुडाल्याने दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

अकोला - जलपुनर्भरणासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आदर्श कॉलनीतील महापालिका शाळेमध्ये रविवारी घडली. "पाणी अडवा, पाणी जिरवा‘ हा उपक्रम जलवर्धक या स्वयंसेवी संस्थेने मे महिन्यात हाती घेतला. त्यांनी महानगरातील विविध प्रभागांमधील खुल्या पटांगणात मोठे खड्डे खोदले. यासाठी त्यांनी महापालिकेची परवानगी घेतली नव्हती. 

पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने त्यात शाळकरी मुले दररोज खेळतात. आदर्श कॉलनीतील सिद्धार्थ राजू घनेगावकर (वय 7) आणि कृष्णा राकेश बहेल (वय 12) हे दोघे खड्ड्यात खेळण्यासाठी उतरले असता, गाळात फसून दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची जबाबदारी घेण्यास कोणीच समोर आले नाही. या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, बालकांच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येईल,  अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two children died in a pit bottom