अकोल्याजवळ बस-ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे येथून प्रवाशी घेऊन सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक AR 02 6001)अकोला येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रक (क्रमांक MP 68 जी 0168 )ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला, यांचे तर लक्झरी बस मधील एक प्रवाशी जागीच ठार झाला.

वाशीम : अकोला-वाशीम राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा जवळ जय महाराष्ट्र ढाब्यासमोर खासगी बस व आयशर ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन ट्रक चालकसह एक प्रवाशी जागीच ठार झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी सहाच्या सुमारास घडली. या अपघातात 13 प्रवाशी गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. खासगी बसमध्ये 26 प्रवाशी प्रवास करत होते.

पुणे येथून प्रवाशी घेऊन सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक AR 02 6001)अकोला येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रक (क्रमांक MP 68 जी 0168 )ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला, यांचे तर लक्झरी बस मधील एक प्रवाशी जागीच ठार झाला. 13 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता, की ट्रकचा समोरील भाग तुटून रस्त्याच्या कडेला पडला. तर ट्रक चालकाचे शीर धडावेगळे झाले. लक्झरी बस रस्त्यावरच पलटी झाली जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: two dead in accident near Akola