ट्रेलरची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

भरधाव असलेल्या ट्रेलरने सुसाट दुचाकीला जबर धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील वर्धमाननगर रेल्वे क्रॉसींग ते पावर हाऊस चौक दरम्यान झाला. होरीलाल रामविलास वर्मा (28) आणि नरेश इतवारी शाहू (35) दोघेही रा. गल्ली नं. 1, बाजार चौक, डिप्टी सिग्नल, नागपूर असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.

नागपूर -भरधाव असलेल्या ट्रेलरने सुसाट दुचाकीला जबर धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील वर्धमाननगर रेल्वे क्रॉसींग ते पावर हाऊस चौक दरम्यान झाला. होरीलाल रामविलास वर्मा (28) आणि नरेश इतवारी शाहू (35) दोघेही रा. गल्ली नं. 1, बाजार चौक, डिप्टी सिग्नल, नागपूर असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.

होरीलाल वर्मा आणि नरेश शाहू हे दोघेही ट्रांसपोर्टशी संबंधित विविध माल वेगवेगळ्या वाहनात चढवणे आणि उतरवण्याशी संबंधित काम करत असतात. शनिवारी मध्यरात्रीनंतर दोघांचे काम आटोपल्यावर ते आपल्या दुचाकी मोटारसायकलवर नेहमीप्रमाणे घराकडे निघाले. वर्धमाननगर रेल्वे क्रॉसींग ते पावर हाऊस चौक दरम्यान एका भरधाव असलेल्या ट्रेलरने (क्रमांक एमएच- 02, कुयू- 7053) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघेही रस्त्यावर आपटल्यामुळे त्यांच्या शरीरातून मोठ्‌या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला.

दरम्यान घटनेचे गांभीर्य बघत ट्रेलर चालकाने वाहन सोडून तेथून पळ काढला. हा प्रकार बघून परिसरात खळबळ उडाली. उपस्थितांनी तातडीने प्रथम पोलिस कंट्रोल रुमला दुरध्वनीवर सूचना दिली. त्यानंतर तातडीने पोलिसांच्या मदतीने दोघांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्‍टरांनी दोघांना तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले. दोघांच्या कुटुंबियांना सूचना दिली गेली. नातेवाईकांनी रात्रीच मेयोत गर्दी केली. पोलिसांनी या प्रकरणात ट्रेलरच्या फरार चालकावर गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. 

मध्यरात्री परिसरात तणाव 
दोनही युवक अपघातात जागीच ठार झाल्यानंतर काही वेळातच मोठा तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीची वेळ असल्यानंतरही मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकांनी ट्रेलर चालकावर रोष व्यक्त केल्यामुळे मेयोतही तेथेही तनाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी दोन्ही ठिकाणी वेळीच पोलीस बंदोबस्त वाढवल्यामुळे अनुचित प्रकार टळला. 

ट्रेलरची जाळपोळ करण्याचा प्रयत्न 
ट्रेलरचालक भरधाव असल्यामुळे त्याला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. चालकाच्या चुकीमुळे दोघांचा जीव गेल्याचे लक्षात येताच नागरिकांनी वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तसेच जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच लकडगंज पोलिस घटनास्थळावर पोहचल्यामुळे मोठी हानी टळल्याची माहिती आहे.

Web Title: two died in bus and Two wheler accident