esakal | घरातून गेलेले 'ते' परतलेच नाही, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

death

घरातून गेलेले 'ते' परतलेच नाही, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : जिल्ह्यातील पांढरकवडा (Pandharkawada yavatmal) येथे पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.8) दुपारी उघडकीस आली. गोविंदा सखाराम जाधव (वय 58) व सखाराम महादेव मुसळे (वय 65, दोन्ही रा. पांढरकवडा) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा: अंजनगाव-परतवाडा मार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पांढरकवडा शहरातील पोलिस ठाण्याच्या मागील परिसरात राहणारे गोविंदा जाधव हे बुधवारी दुपारी दोन वाजता खुनी नदीच्या महादेव घाटावर गेले होते. ते नदीपात्रात असताना सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढला. त्या प्रवाहात तोल गेल्यामुळे ते वाहून गेले.

दुसर्‍या घटनेत शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त वनमजूर सखाराम मुसळे हे घरी पाणी नसल्यामुळे तातापूर येथील शेतशिवारातील विहिरीवर अंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज आला नसल्याने दुर्दैवाने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी या दोघांच्याही मृतदेहांचा पंचनामा केला. पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. या घटनांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंजली कानबाले व जमादार राजू मोहुर्ले करीत आहेत.

loading image
go to top