esakal | अंजनगाव-परतवाडा मार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

amravati accident

अंजनगाव-परतवाडा मार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : अंजनगाव-परतवाडा महामार्गावर (anjangaon paratwada highway) बुधवारी (ता. आठ) झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या व्यक्तीचा उपचारासाठी अमरावती (amravati) येथे नेत असताना रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी गावाच्या स्मशानभूमीजवळील वळणावर गेल्या 15 दिवासांत झालेला हा दुसरा भीषण अपघात आहे.

हेही वाचा: खराब रस्त्यांमुळे अपघात झाला तर चालक दोषी नाही - न्यायालय

अंजनगावसूर्जी येथील मेडिकल दुकान चालक, पाणी फाउंडेशनचे कार्यकर्ते, उत्कृष्ट निवेदक व वक्ता प्रमोद निपाणे हे कार्यक्रमाकरिता स्वतःच्या कारने (एमएच 27 बीव्ही 2012) अचलपूर येथे जात होते. त्यांच्यासोबत येथील अंगणवाडी सेविका ललिता चव्हाण यासुद्धा जात होत्या. अंदाजे 12 वाजेदरम्यान पांढरी येथील वळणावर परतवाडा येथून अंजनगावसुर्जीकडे येत असलेल्या ट्रकने (क्रमांक ः जीबी 2602) समोरासमोर दिलेल्या धडकेने कारला जवळपास पन्नास फूट फरफटत नेल्याने कारमध्ये बसलेल्या चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रमोद निपाणे यांना पांढरी येथील नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने गाडीतून बाहेर काढत अंजनगावसुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा पांढरीसह संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. अंजनगावसुर्जी येथील पोलिस प्रशासनाने महामार्गाच्या क्रेनने ट्रकमध्ये फसलेले वाहन काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेला हा दुसरा अपघात आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. महामार्ग बांधत असताना अपघातासाठी कारण ठरणारे वळण प्रशासनाने काढू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नसून महामार्ग प्रशासन आणखी किती अपघाताची वाट पाहत आहे? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

loading image
go to top