esakal | साखर झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, घर कोसळल्यानं पती-पत्नीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

wardha

साखर झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, घर कोसळल्यानं पती-पत्नीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खरांगणा मोरांगणा (जि. वर्धा) : संततधार पावसामुळे घराची भिंत पडल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ९) पहाटेच्या सुमारास दहेगाव गोंडी (dahegaon gondi wardha) येथे घडली. रामकृष्ण चौधरी वय (४५ वर्षे), ज्योती चौधरी (वय ३५ वर्षे) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. या घटनेत मुलगा आदित्य गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा: खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट, मुलगा-सुनेचं वैदीक पद्धतीनं लग्न

नेहमीसारखे चौधरी कुटुंब हे रात्री झोपी गेली होते. सततच्या पावसाने त्यांच्या घराची मातीची भिंत खचून पूर्ण घर मध्यरात्री अचानक झोपेत असलेल्या चौधरी कुटुंबियांच्या अंगावर कोसळले. यात ज्योती चौधरी मातीच्या मलब्यात दबल्या गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर पती रामकृष्ण चौधरी व मुलगा आदित्य चौधरी याला सामान्य रुग्णालय वर्धा येथे नेताना पती रामकृष्ण चौधरी यांचा वाटेतच मृत्यू झाला. मुलगा आदित्यवर याला जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सुद्धा चिंताजनकच असल्याची माहिती आहे.

परिसरातील नागरीकांनी शर्थीचे प्रयत्न करुन मातीच्या ढिगाऱ्यात दबलेल्या चौधरी कुटुंबियांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. ॲम्बुलन्सची व्यवस्था करून मृतदेह छवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पती-पत्नीच्या अपघाती मृत्यूने पूर्ण दहेगाव गोंडी या गावात शोककळा पसरली असून परिसरात घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

वेळीच मिळाली नाही मदत -

सततच्या मुसळधार पावसाने चौधरी यांचे कुडाचे घर पहाटेच्या सुमारास जमीनदोस्त झाले. यात घरात झोपून असलेले तीनही व्यक्ती मातीच्या ढीगाऱ्यात दबल्या गेले. सततच्या पावसाने कुणीही बाहेर निघाले नसल्याने घटनेची माहिती वेळेत परिसरातील नागरीकांना मिळाली नाही. त्यामुळे काही काळ हे कुटुंब मातीच्या ढिगाऱ्यात दबून राहिल्याने ज्योतीचा जागीच, तर पती रामकृष्ण यांना रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

loading image
go to top