esakal | दुचाकीची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात

दुचाकीची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : जिल्ह्यातील नंदोरी (nandori wardha) येथे दुचाकीने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना नंदोरी ते खांबाडा महामार्गावर घडली असून समुद्रपूर पोलिसांत (samudrapur police) घटनेची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: खराब रस्त्यांमुळे अपघात झाला तर चालक दोषी नाही - न्यायालय

गजानन तळवेकर आणि महेंद्र हरणे, असे मृतांचे नावे असून दोघेही सुमठाणा येथील रहिवासी होते. दोघेही ७ सप्टेंबरला कामानिमित्त नंदोरी येथे दुचाकीने गेले होते. काम आटोपल्यानंतर दोघांनाही गावाचा रस्ता धरला. रस्त्यात पाऊस लागला. डोंगरगाव पाटीपासून दक्षिणेस 100 मीटर अंतरावर नंदोरी ते खांबाडा महामार्गावर रस्त्याच्या कडेला एक ट्रक बंद अवस्थेत उभा होता. मोटर सायकलचा मंद प्रकाश व पाऊस सुरू असल्याने त्यांना समोर उभा असलेला ट्रक दिसला नाही. त्यामुळे मोटर सायकलने मागील बाजूने ट्रकला धडक दिली. यात मोटर सायकल चालक गजानन तळवेकर आणि सहकारी महेंद्र हरणे दोघांचे डोके ट्रकवर आदळले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

loading image
go to top