15 हजारांची लाच घेताना दोन डॉक्‍टरांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

गोंदिया : ऑर्थोपेडिक इम्प्लांटच्या साहित्यांची देयके मंजूर केल्यानंतर 20 टक्के रकमेची मागणी करणाऱ्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन डॉक्‍टरांना 15 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (ता. 19) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केली.

डॉ. मनिंदर तिलकचंद जांभूळकर (वय 34, सहायक प्राध्यापक) व डॉ. निखिल मधुकर भरणे (वय 40, समन्वयक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे दोघेही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे काम पाहतात. यातील तक्रारदार हे ऑर्थोपेडिक इम्प्लांटचा व्यवसाय करतात. मागील दोन महिन्यांत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिव्यंग रुग्णांकरिता साहित्य पुरवठा केला होता. याचे एकूण देयके 1 लाख 23 हजार 65 रुपये इतके आहे. या मंजूर देयकांपैकी 20 टक्के रक्कम म्हणजे 24 हजार रुपये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. निखिल भरणे यांनी मागितले. मात्र, तक्रारदाराने 13 नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पथकाने पडताळणी करून बुधवारी सापळा रचला. या वेळी तक्रादाराकडून 15 हजार रुपये स्वीकारताना डॉ. जांभूळकर याला रंगेहाथ अटक केली. ही रक्कम डॉ. निखिल भरणे याने डॉ. जांभूळकर याच्या हस्ते स्वीकारली. त्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या पथकाने केली.

Web Title: Two doctors arrested for accepting a bribe of 15 thousand