esakal | किती हे दुर्दैव! नदीच्या मध्यभागी पोहोचले अन नावेने दिला दगा...
sakal

बोलून बातमी शोधा

chandrapur accident

सावली तालुक्‍यातील कढोली येथील रमाबाई कन्नाके या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. कन्नाके कुटुंबीयांचे बरेच नातेवाईक गडचिरोली जिल्ह्यात येत असलेल्या चामोर्शी तालुक्‍यातील राजगोपालपूर येथे राहतात. त्यांना याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राजगोपालपूर येथील रामचंद्र हनुजी पेंदाम, परशुराम वाघू आत्राम, अमोलजित सुरेश कन्नाके, देवराव मोहन कन्नाके, केशव मोहन कन्नाके, गंगाधर सोनू वेलादी, संदीप देवराव कन्नाके, कमलाबाई देवराव कन्नाके हे कढोली येथे येण्यासाठी निघाले.

किती हे दुर्दैव! नदीच्या मध्यभागी पोहोचले अन नावेने दिला दगा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साखरी (जि. चंद्रपूर) : सावली तालुक्‍यातील कढोली येथे अंत्यसंस्कारासाठी येणारी नाव वैनगंगा नदीच्या पात्रात बुडाली. यात दोघांचा बुडून मृत्यू झाला; तर सहा जण बचावले. मंगळवारी (ता. 14) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रामचंद्र हनुजी पेंदाम (वय 40 रा. राजगोपालपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली), परशुराम वाघू आत्राम (वय 42, रा. राजगोपालपूर) अशी मृतांची नावे आहेत. बुडालेल्या दोघांचाही अद्याप शोध लागला नाही.

सावली तालुक्‍यातील कढोली येथील रमाबाई कन्नाके या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. कन्नाके कुटुंबीयांचे बरेच नातेवाईक गडचिरोली जिल्ह्यात येत असलेल्या चामोर्शी तालुक्‍यातील राजगोपालपूर येथे राहतात. त्यांना याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राजगोपालपूर येथील रामचंद्र हनुजी पेंदाम, परशुराम वाघू आत्राम, अमोलजित सुरेश कन्नाके, देवराव मोहन कन्नाके, केशव मोहन कन्नाके, गंगाधर सोनू वेलादी, संदीप देवराव कन्नाके, कमलाबाई देवराव कन्नाके हे कढोली येथे येण्यासाठी निघाले. राजगोपालपूर ते कढोली हा प्रवास नावेने करावा लागतो. त्यामुळे हे सर्वजण तळोधी घाटावर आले. घाटावर पुनाजी महागू मेश्राम यांची नाव होती. याच नावेत सर्वजण बसले. त्यानंतर नाव कढोलीच्या दिशेने निघाली.

क्लिक करा - घरी सोडून देण्याचा बहाणा करून केला घात...

दोघांचा मृत्यू, सहा जण बचावले
कढोली घाटाजवळ नाव पोहोचताच ती एका बाजूने झुकली गेली. त्यामुळे नावेत बसलेले सर्वच घाबरून गेले. त्याचवेळेस नावेत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने नाव बुडाली. त्यात रामचंद्र हनुजी पेंदाम, परशुराम वाघू आत्राम हे बुडाले. उर्वरित अमोलजित सुरेश कन्नाके, देवराव मोहन कन्नाके, केशव मोहन कन्नाके, गंगाधर सोनू वेलादी, संदीप देवराव कन्नाके आणि कमलाबाई देवराव कन्नाके यांना आपला जीव वाचविण्यात यश आले. या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी सावली पोलिसांना दिली.

हेही वाचा - गृहमंत्र्याचा मंत्र, आता विकासकामाला लागूया!
 

कढोली येथील घटना, मृत गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी
माहिती मिळताच पोलिसांचे पथक कढोली घाटावर पोहोचले. त्यांनी बुडालेल्या दोघांचा शोध घेणे सुरू केले. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. घटनास्थळावर तहसीलदार कुमरे, बीडीओ अमोल भोसले यांनी भेट दिली. सायंकाळी चंद्रपूर आणि गडचिरोली येथील रेस्क्‍यू चमू दाखल झाली. त्यांच्या माध्यमातून मृतांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप मृतदेह मिळाले नाहीत.

नदीपात्रात मगरीचे वास्तव्य
वैनगंगा नदीच्या कढोलीगावाजवळील पात्रात मगरीचे वास्तव्य आहे. अनेकांनी या भागात मगरीला बघितले आहे. मगरीमुळे याआधी नाव उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. आजची घटनाही मगरीमुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

loading image