दोन विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

साकोली (जि. भंडारा) : तालुक्‍यातील वडद येथील दोन विद्यार्थिनींचा शनिवारी मुरमाच्या खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांची नावे त्रिशाली चोपराम आंबेडारे (वय 12) व साधना ताराचंद नेवारे (वय 10) आहे.

साकोली (जि. भंडारा) : तालुक्‍यातील वडद येथील दोन विद्यार्थिनींचा शनिवारी मुरमाच्या खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांची नावे त्रिशाली चोपराम आंबेडारे (वय 12) व साधना ताराचंद नेवारे (वय 10) आहे.
त्रिशाली आंबेडारे सहाव्या वर्गात तर साधना नेवारे चौथीत वडद येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत होत्या. दोघीही शनिवारी सकाळी शाळा आटोपल्यावर घरी आल्या. घरातील सर्व मंडळी शेतात रोवणीच्या कामासाठी गेली होती. त्यामुळे घरी असलेला लहान मुलगा रडत होता. त्या मुलाला त्याच्या आईकडे नेऊन देण्यास दोघी शेतात गेल्या. शेतातून पायवाटेने घरी परत येताना त्यांचे पाय चिखलाने माखले. त्यामुळे दोघी पाय धुण्यास मुरमाच्या खाणीकडे गेल्या. परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खाणीत तुडुंब पाणी भरले असून मुलींना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघी खोल पाण्यात बुडाल्या.
सायंकाळी मुली घरी नसल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला. तेव्हा खाणीजवळ मुलींच्या चपला आढळल्याने पाण्यात शोध घेतला तेव्हा दोघींचे मृतदेह आढळून आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two girls died in water