धत तेरी की! दोन नवरदेवांसह एका नवरीला कोरोना; दुसरीच्या अहवालाची प्रतीक्षा

Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news
Two Husband and one Bride corona positive Yavatmal corana virus news

दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्यातील दोन नवरदेवांसह एका नवरीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दुसऱ्या नवरीच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

सोमवारी (ता. २२) ३५ नवीन कोरोनाबधित आढळले असून, दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. काही दिवसांत प्रशासनाने चाचण्या वाढवल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसत आहे. लोक सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर व मास्क न वापरतात वावरत होते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे.

लग्न व समारंभामध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. लोकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले असून जिल्ह्यात संचरबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा एक हजारांच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एक मार्च २०२१पर्यत ‘मिशन बिगेन अगेन’अतंर्गत देण्यात आलेली सुट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यवतमाळ, पांढरकवडा तसेच पुसद परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती.

यानंतर रविवारी यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नवे आदेश निर्गमित केले आहे. त्यानुसार आता सर्व दुकाने,आस्थापनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com