टिप्परच्या धडकेत दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नरखेड - भिष्णूर - खरसोली मार्गावर काटोलला जाणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. यात दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एक गंभीर असून, त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. गौरव चवडे व नितीन गजभिये अशी मृतांची नावे आहेत.

नरखेड - भिष्णूर - खरसोली मार्गावर काटोलला जाणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. यात दोन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एक गंभीर असून, त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. गौरव चवडे व नितीन गजभिये अशी मृतांची नावे आहेत.

बुधवारी (ता. 28) दुपारी दीडच्या सुमारास खरसोली येथील गौरव मधुकर चवडे (वय 22), नितीन धनराज गजभिये (वय 24), अमित चंद्रमणी गजभिये (वय 23) हे दुचाकी (क्रमांक एमएच 40 एएन 6630)ने भिष्णूर मार्गे काटोलला जात होते. भिष्णूर येण्यापूर्वी मसली फाट्याजवळील वळणावर नरखेडला जाणाऱ्या टिप्पर (क्रमांक एमएच 40 एन 6336)ने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी टिप्परमध्ये जाऊन घुसली. त्यामुळे गौरव चवडे व नितीन गजभिये यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अमित गजभिये गंभीर जखमी असून, त्याला नागपूरला हलविण्यात आले. ठाणेदार विजयकुमार तिवारी, पोलिस उपनिरीक्षक विजय कोरडे, हेडकॉन्स्टेबल इखार, दिलीप इंगळे, कॉन्स्टेबल किशोर लोही, कुणाल अरगुंडे, नीलेश खरडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश महंत यांच्या नेतृत्वात डॉ. पारिसे, डॉ. घोलपे व डॉ. वैखंडे यांनी वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी टिप्पर व दुचाकी जप्त केली.

थोरला कॅन्सरने गेला, धाकटा अपघातात
अपघातातील मृत तरुण गौरव याचे वडील राज्य परिवहन महामंडळात वाहक आहेत. त्याला एक भाऊदेखील आहे. गौरव हा शेतीसोबत ट्रॅक्‍टरचा जोडव्यवसाय करायचा. नितीन हा त्याच्या मोठ्या भावाचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर आईवडिलांना एकुलता होता. गावातील छोटेसे किराणा दुकान चालवून, घरखर्चाला हातभार लावत होता. एका मुलाचा कॅन्सरने, तर आता दुसऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने आईवडिलांवर दुःखाचा पहाडच कोसळला आहे.

भिष्णूर व खरसोलीवासींत फ्रीस्टाइल
अपघाताची चर्चा भिष्णूर व खरसोली येथे वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे दोन्ही गावांतील लोकांनी अपघात पाहण्यासाठी एकच गर्दी केली. याचवेळी भिष्णूरच्या एकाने मृताबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे खरसोलीवासींचा पारा गरम झाला. त्याचे रूपांतर मारहाणीपर्यंत पोहचले. दोन्ही गटांत मारहाण सुरू असतानाच ठाणेदार तिवारी यांनी मध्यस्थी केली.

Web Title: Two killed in accident

टॅग्स