अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

अमरावती : जिल्ह्यातील अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. कुऱ्हा ते अमरावती व फत्तेपूर ते शिवणगाव मार्गावर मागील बारा तासांत या घटना घडल्या.

अमरावती : जिल्ह्यातील अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. कुऱ्हा ते अमरावती व फत्तेपूर ते शिवणगाव मार्गावर मागील बारा तासांत या घटना घडल्या.
देविकिसन श्रीचंद राठोड (रा. वीरगव्हाण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. श्री. राठोड हे एमएच 27 ए.यु. 1780 क्रमांकाच्या दुचाकीने कुऱ्हाहून अमरावतीकडे येत असताना शुक्रवारी रात्री विरुद्ध दिशेने येणाऱ्या कुऱ्हा ठाण्याच्या एमएच 27 एए 0426 क्रमांकाच्या जीपने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी देविकिसन यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविले. उपचारादरम्यान शनिवारी (ता. 21) राठोड यांचा मृत्यू झाला. परसराम नेलसिंग राठोड यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी त्यांच्याच ठाण्यातील पोलिस कर्मचारी जीपचालक सुधीर शिरभाते विरुद्ध गुन्हा दाखल केला.
अपघाताची दुसरी घटना, रविवारी (ता. 22) पहाटेच्या सुमारास फत्तेपूर ते शिवणगाव मार्गावर घडली. अतुल प्रकाश खडसे (वय 24 रा. फत्तेपूर) हा एमएच 27 एएम 5617 क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच 27 बीएफ 3344 क्रमांकाच्या फोर्ड कारने दुचाकीला उडविले. त्यात गंभीर जखमी युवक अतुलचा मृत्यू झाला. नांदगावपेठ पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in accident