बऱ्याच दिवसांनी मित्र घरी आल्याने घेतला सहभोजनाचा आनंद, मग घडले असे... 

Two killed in truck accident in Chandrapur
Two killed in truck accident in Chandrapur

धाबा (जि. चंद्रपूर) : शेतीचे काम असल्याने दोघे मित्र पोंभुर्णा तालुक्‍यातील चेकठाणा येथे गेले. दिवसभर शेतीचे काम केले. मात्र, काम पूर्ण करण्यात त्यांना बराच उशीर झाला. रात्र झाल्याने दोघांनी मित्राच्या घरी थांबण्याचा निर्णय घेतला. रात्री त्यांनी मित्राच्या कुटुंबासोबत सहभोजन केले. दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताकदिन असल्याने पहाटेच गावाकडे ते निघणार होते. मात्र, प्रजासत्ताक दिनाची गोड झोप त्यांच्यासाठी शेवटची ठरली. ट्रक घरात शिरल्याने दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी पाच वाजता उघडकीस आली. उमाजी तिवाडे (वय 49) आणि देविदास वासुदेव झगडकर (45) अशी मृतांची नावे आहेत. 

उमाजी व देविदास हे दोघेही झगडकर रिठ येथील रहिवासी आहेत. त्यांची शेती चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्‍यात असलेल्या चेकठाणा येथे आहे. शेतीचे काम असल्याने ते चेकठाणा येथे गेले होते. शेतीचे काम करण्यात त्याना बराच उशीर झाला. तसेच रात्रही झाली होती. उशीर झाल्याने त्यांनी चेकठाणा येथील सोनटक्के यांच्या घरी रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. तशी पूर्वसूचना त्यांनी सोनटक्‍के यांना दिली होती. 

मित्र घरी येत असल्याने सोनटक्‍के यांनी जेवणाची व्यवस्था केली. तिघांनीही सहभोजनाचा आनंद घेतला. गप्पा गोष्ठी केल्यानंतर ते खाटेबवर झोपी गेले. स्वप्नांच्या गोड दुनियेत मन हरविले असतानाच काळाने झडप घातली. गिट्टी भरलेला एमएच 31/ बीजी 2262 क्रमांकाच्या ट्रकने (हायवा) सोनटक्‍के यांच्या घरालाच धडक दिली. ट्रक घराची भिंत तोडून आत शिरल्याने उमाजी तिवाडे व देविदास झगडकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. 

घर हावेल लागून

सोनटक्‍के यांचे घर बसस्थानकर परिसरात हायवेला लागून आहे. मित्र आल्याने सोनटक्‍के कुटुंबानी सोबत जेवण केले. पहिल्या खोलीत झगडकर आणि तिवाडे झोपले होते. दुसऱ्या खोलीत सोनटक्के कुटुंब झोपले होते. सकाळी पाच वाजताच्या सुमारास नंदोरी येथून गिट्टीने भरलेला भरधाव ट्रक विठ्ठलवाडाकडे जात होता. चालकाना डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले अन्‌ सोनटक्के यांच्या घरातच ट्रक शिरला. यात झगडकर व तिवाडे यांचा घटस्थळीच मृत्यू झाला. 

नागरिकांचा रास्तारोको

ट्रक घरात शिरून दोघांचा मृत्यू झाल्याने समजताच गावकरी संतप्त झाले. पोलिसांना माहिती देत गावकरी रस्त्यावर आले. यानंतर गावकऱ्यांनी रास्तारोको केला. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोंभुर्णा, बेंबाळ पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com