स्टंटबाजी जीवावर बेतली, ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू,

स्टंटबाजी जीवावर बेतली, ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू,

बुटीबोरी, (जि. नागपूर) : नागपूरकडून बुटीबोरीला येत असताना नादुरुस्त उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक तरुण ठार झाला, तर मागे बसलेला मित्र किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव शिवारात घडली. 
आशीष मोतीराम शेंदरे (24, दुर्गानगर, एसआरपीएफ गेट क्र. 1 हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. या घटनेत जखमी झालेला अश्विन लहूजी उईके (24) हा मृताचा मित्र आहे. सविस्तर वृत्त असे की, आशीष व अश्विन हे दोघेही एकाच वस्तीत शेजारी राहत असल्यामुळे ते चांगले मित्र होते. ते दोघेही नेहमी सोबतच वेळ घालवत होते. घटनेच्या दिवशी दोघेही दारू पिऊन 
मौजमजा करण्याकरिता नागपूरवरून बुटीबोरीमार्गे दुचाकीने स्टंटबाजी करत भरधाव वेगाने वाहन पळवीत होते. बुटीबोरीपासून 3 किलोमीटर अंतरावरील मोहगाव शिवरानजीक दुचाकीचालक आशीषचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकवर जाऊन दुचाकी आदळली. त्यात चालक आशीष हा गंभीररीत्या जखमी झाला, तर अश्विन याला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी तातडीने कर्मचारी पोलिस शिपाई नामदेव कोडापे, अमृत किनगे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तत्काळ बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तपासून आशीषला मृत घोषित केले. अश्विनवर वैद्यकीय उपचार करून पोलिसांनी घटनेची नोंद केली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना 
केला. पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com