"सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'ची दोन किलोमीटर महारॅली

file photo
file photo

यवतमाळ : "सेव्ह मेरीट सेव्ह नेशन' मोहिमेंतर्गत शुक्रवारी (ता.नऊ) क्रांतिदिनी विविध 16 समाजातील बांधवांनी दोन किलोमीटर राष्ट्रनिर्माण महारॅली काढली. अतिआरक्षणामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
येथील समता मैदानापासून महारॅलीची सुरुवात सकाळी नऊला झाली. पूनम चौक, हनुमान आखाडा चौक, पाचकंदील चौक, नेताजी चौक, दत्त चौक, संविधान चौक, येरावार चौक, तिरंगा चौकमार्गे मार्गक्रमण करीत पुन्हा समता मैदानावर येऊन महारॅलीचा समारोप झाला. महारॅलीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खुल्या प्रवर्गातील महिला, पुरुष, युवक-युवती नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'ची घोषणा देत अतिआरक्षणाबाबत सहभागींनी आवाज उठविला. डॉ. के. के. अग्रवाल यांनी "सेव्ह मेरीट सेव्ह नेशन' मोहिमेची शपथ दिली. सजविलेला रथ व त्यानंतर शाळकरी मुला-मुलींच्या हातातील "आमच्या भविष्याचे काय?' असे प्रश्न विचारणारे फलक लक्ष वेधून घेत होते. महारॅलीतील नागरिकांसाठी "यवतमाळचा राजा' गणपती मंडळातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुणवंतांचे रक्षण करण्यासाठी सिमित व्हावे, आरक्षण व राष्ट्रनिर्माणासाठी सर्व समाज एकजूट झाले. समता मैदानातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चिंतलवार व कमल बागडी यांनी केले. संयोजक ऍड. अशोक भंडारी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com