esakal | भरधाव ट्रकनं दिली दुचाकीला धडक; भंडारा जिल्ह्यातील दोन युवक जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Two men are no more in accident in Bhandara district

ही घटना आज, शनिवारी सकाळी पिंपळगाव (कोहळी) गावाजवळ घडली. ऋषी गोविंदा खोब्रागडे (वय ४२) आणि राजेंद्र मनिराम शेंडे (वय ३६) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.

भरधाव ट्रकनं दिली दुचाकीला धडक; भंडारा जिल्ह्यातील दोन युवक जागीच ठार

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

लाखांदूर (जि. भंडारा) : अर्जुनी/मोरगाव तालुक्‍यातून दुचाकीने लाखांदूर तालुक्‍यातील गावात येताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला. 

जाणून घ्या - 'त्यांच्या' गाडीचा हॉर्न ऐकताच महामार्गावर जमतात असंख्य कावळे; याला दातृत्व म्हणावं की मैत्री

ही घटना आज, शनिवारी सकाळी पिंपळगाव (कोहळी) गावाजवळ घडली. ऋषी गोविंदा खोब्रागडे (वय ४२) आणि राजेंद्र मनिराम शेंडे (वय ३६) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, शनिवारी सकाळी ऋषी खोब्रागडे आणि राजेंद्र शेंडे हे दोघे अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातून एमएच ३५ / क्‍यू ७९२५ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने लाखांदूर तालुक्‍यातील पिंपळगाव (कोहळी) येथे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या सीजी ०८/ एल २१५५ क्रमांकाच्या ट्रकने पिंपळगाव (कोहळी) गावाजवळ दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघात एवढा जोरदार होता की, या धडकेत दुचाकीवरील ऋषी खोब्रागडे आणि राजेंद्र शेंडे हे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

क्लिक करा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं उघडला बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन 

अपघातानंतर या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना व लाखांदूर पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार मनोहर कोरेटी, पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक तामेश्वर चमाराय साहू (वय २१, रा. राजनांदगाव) याला अटक केली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image