esakal | अंधत्वाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन लाख नेत्रगोलांची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : नेत्रदान पंधरवड्याची माहिती देताना डॉ. अशोक मदान; बाजूला डॉ. कविता धाबर्डे, डॉ. राजेश जोशी व डॉ. स्नेहल बोंडे.

अंधत्वाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन लाख नेत्रगोलांची गरज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर,  देशात यावर्षी केवळ 52 हजार नेत्रगोल दानातून जमा झाले. यातून 28 हजार व्यक्तींमधील अंधत्व दूर करण्यात आले. मात्र, दरवर्षी अंधत्वाचा अनुशेष वाढत आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी एका वर्षात दोन लाख नेत्रगोलांची गरज असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेडिकल)चे नेत्रविभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली.नेत्रदानबाबत अधिक जागरुकता आणण्यासाठी नेत्रदान पंधरवाडा सुरू झाला आहे. हे निमित्त साधून डॉ. मदान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नेत्रदान संकल्प सोहळ्याला सोमवारी (ता. 26) सकाळी 11 वाजता नेत्रदान जागरुकता रॅलीने प्रारंभ होणार आहे. उद्‌घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा राहतील. जगातील प्रत्येक पाच अंधांपैकी एक अंध भारतात आहे. जगातील साडेचार कोटींपैकी भारतात सुमारे एक कोटी 70 लाख दृष्टिहीन आहेत. त्यापैकी 55 टक्के अंधत्व केवळ मोतिबिंदूमुळे आलेले असते. यातील 80 टक्के व्यक्ती 50 वर्षाच्या आतील असतात. नेत्ररोपण शस्त्रक्रियेद्वारे यांना पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते. देशात दरवर्षी 75 लाख व्यक्तींचा अपघातासह विविध कारणांनी मृत्यू होतो. यातील केवळ 52 हजार व्यक्ती नेत्रदान करतात. यामुळेच अंधांच्या डोळ्यात उजेडपेरणीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. दरवर्षी देशात 12 लाख लोक बुबुळाअभावी दृष्टिहीन राहातात. राज्यात यावर्षी केवळ आठ हजार व्यक्तींनी नेत्रदान केले, असेही डॉ. मदान यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सहयोगी प्राध्यापक डॉ. कविता धाबर्डे, डॉ. राजेश जोशी, डॉ. मीनल व्यवहारे, डॉ. स्नेहल बोंडे-चावरिया, डॉ. नीलेश गद्देवार उपस्थित होते.

loading image
go to top