१२ तासांत दोन युवकांचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नागपूर - परिसरातील वर्चस्वावरून झालेल्या वादातून हुडकेश्‍वर आणि पाचपावलीत दोन युवकांचा खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. अमित रामटेके (हुडकेश्‍वर) आणि अरमान अन्सारी (पाचपावली) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. या दोन्ही हत्याकांडांनंतर पुन्हा एकदा उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

पहिल्या घटनेत, अमित रतन रामटेके (वय २७, रा. विणकर वसाहत, मानेवाडा) हा शनिवारी साडेआठच्या सुमारास आरोपी शैलेश हिरामण गोलानी (३३, मानेवाडा) याच्या पानठेल्यावर आला होता. त्याने सिगारेट घेतली आणि पैसे दिले नाही. यावरून वाद झाल्याने शैलेश आणि मित्र कार्तिक पुरुषोत्तम धार्मिक (मानेवाडा) यांनी अमितवर चाकू व तलवारीने हल्ला करीत खून केला. घटना हुडकेश्‍वरातील परिवर्तन चौक, बेसा इंडियन बॅंकेजवळ येथे झाली. हुडकेश्‍वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत, पाचपावलीतील अरमान अन्सारी (वय २५, रा. म्हाडा कॉलनी, जरीपटका) याचा शेजाऱ्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादातून तिघांनी अरमानचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. 

वाहनांच्या पार्किंगवरून अरमान आणि नसीम यांच्यात नेहमी वाद होत होते. अरमान हा नेहमीच वाद करीत असल्यामुळे आरोपींनी कंटाळून राणी दुर्गावती चौकात घर घेतले. शनिवारी पुन्हा वाहनाच्या पार्किंगवरून वाद झाला. त्यामुळे नेहमीची कटकट मिटविण्याच्या उद्देशाने आरोपी नसीम शेख, जुबेर शेख आणि वसीम शेख यांनी रात्री अकराला टेकानाका-नवी वस्ती परिसरात लोखंडी रॉडने वार करून खून केला.

हत्याकांडाला पोलिस जबाबदार
शनिवारी सायंकाळी अरमान आणि जुबेर यांच्यात पुन्हा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. हे प्रकरण जरीपटका पोलिस ठाण्यात गेले. मात्र, पोलिस निरीक्षक पराग पोटे यांनी गांभीर्याने घेतले नाही. अदखलपात्र गुन्हा दाखल करून दोघांना माघारी पाठवले. अरमान रात्री अकराला जेवण केल्यानंतर टेकानाक्‍यावर पानठेल्यावर गेला. शेख भावंडांनी त्याचा पाठलाग करीत त्याला ठार केले. जर पीआय पोटे यांनी वेळीच कारवाई केली असती, तर अरमानचा खून झाला नसता. 

Web Title: two murder in 12 hours crime