esakal | मोठी बातमी : भंडारा जिल्ह्यात नव्या आजाराचा प्रवेश, यामुळेच झाला त्या दोघांचाही मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Sari patient

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. या वॉर्डात शुक्रवारपर्यंत 31 जणांना विलगीकरण केले होते. शुक्रवारी (ता. 17) रात्री 10 वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्‍यातील गोपीवाडा येथील 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने 16 एप्रिलला रात्री साडेआठ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोशलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते.

मोठी बातमी : भंडारा जिल्ह्यात नव्या आजाराचा प्रवेश, यामुळेच झाला त्या दोघांचाही मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारार्थ दाखल दोन रुग्णांचा तीन तासांच्या कालावधीत मृत्यू झाला. अनेक व्याधींसह "सारी' (सिव्हिअर अॅक्‍युट रेस्पिरेटरी इन्फेक्‍शन्स) आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांसाठी विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. या वॉर्डात शुक्रवारपर्यंत 31 जणांना विलगीकरण केले होते. शुक्रवारी (ता. 17) रात्री 10 वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्‍यातील गोपीवाडा येथील 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने 16 एप्रिलला रात्री साडेआठ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोशलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यांना न्यूमोनिया व आठ महिन्यांपासून मधुमेहाचे निदान करण्यात आले. तसेच सहा महिन्यांपूर्वी कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. लक्षणावरून कोरोना संशयित असल्याने घशाचे नमुने घेऊन नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल अप्राप्त आहे. तुमसर तालुक्‍यातील खापा येथील 70 वर्षीय रुग्णास खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. श्‍वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना 17 एप्रिलला सायंकाळी सात वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.

त्यांना उच्च रक्तदाब व न्युमोनिया असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होता. प्रकृती खालावल्याने त्यांचा 17 एप्रिलच्या मध्यरात्री 12.15 वाजता मृत्यू झाला. कोरोनाचे लक्षण असल्याने त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविले. नमुन्याचा अहवाल आल्यानंतरच ते कोरोना बाधित होते की नाही हे स्पष्ट होईल. दोन्ही रुग्णांचा मृत्यू न्युमोनिया व तीव्र श्‍वासदाह (सारी)ने झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनानंतर "सारी' आजाराने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
 
भाजीतून तर नाही ना येत कोरोना; त्यांना वाटतेय धास्ती 

मृतांचा अहवाल निगेटिव्ह 
दोन्ही रुग्ण आयसोलेशन वॉर्डात भरती असल्याने त्याचे घशाचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले होते. दरम्यान, कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन व जिल्हावासींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सध्या तरी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.

loading image