Nagpur Accident News: "भरधाव कार..., मोठ्या आवाजात गाणी अन्..."; रील बनवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव तर ३ जण जखमी

Nagpur Accident News: गेल्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच नागपुरमधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नागपूर कोराडीजवळील पाझरा गावात एक कार उलटल्याने भीषण अपघात झाला आहे.
Nagpur Accident News
Nagpur Accident NewsEsakal

गेल्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या आणि अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच नागपुरमधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नागपूर कोराडीजवळील पाझरा गावात एक कार उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. रील बनवताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारमध्ये बनवलेलं रील आता समोर आलं आहे. या रीलमध्ये कारचालक बेशिस्तपणे कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात झालेल्या कारमध्ये चालक व्यवस्थित कार चालवत नसल्याचं दिसत आहे, त्याचबरोबर कारमध्ये मोठ्या आवाजत गाणी सुरू असल्याचंही दिसून येत आहे. ही कार रेलिंगला धडकल्यानं भीषण अपघात झाला. त्यामध्ये २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur Accident News
प्रक्षोभक भाषणे करत धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; नितेश राणेंसह दोन भाजप आमदारांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

जखमी झालेल्यांमध्ये भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पीएच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तरूण विचित्र पध्दतीने कार चालवत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. रील बनवण्याच्या नादात हा अपघात झाला आहे. रील बनवणं दोन जणांच्या जीवावरती बेतलं आहे.

Nagpur Accident News
'लाडकी बहीण'ला कर्नाटकातील प्रमाणपत्राची अडचण; स्थलांतरित युवती, विवाह झालेल्या महिलांचे अर्ज नाकारले

गेल्या काही दिवसांमध्ये रील बनवण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप तरूणाई या गोष्टीला गांभीर्याने पाहत नसल्याचं दिसून येत आहे. हा अपघात भरधाव गाडीमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nagpur Accident News
Winter Session 2024 : सत्ताधारी अन् विरोधक दोन्ही बाजूंनी गोंधळ; शेवटी मार्शल बोलावण्याचे उपसभापतींचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com