अरे देवा! ई पास नसल्याने दुसऱ्या मार्गाने गेले अन घडला दुर्देेवी प्रसंग

संदीप रायपूरे
Friday, 28 August 2020

परतीच्या वेळी अगदी गावाजवळ येताच मुख्य मार्गावरील खडयाने त्यांना घात केला.यात एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. रात्रीच्या सुमारास वढोली खराळपेठ मार्गादरम्यान हा अपघात घडला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : एसटीचे दोन वाहनचालक गडचिरोली आगारात जाण्यासाठी बाईकने निघाले. गडचिरोली जिल्हयाच्या सिमेवरील आष्टी नाक्यावर त्यांना पोलिसांनी अडवले. ई- पास नसल्याने त्यांना परत पाठविण्यात आले. आगारात जाणे आवश्यक असल्याने त्यांनी आड मार्ग निवडला.

परतीच्या वेळी अगदी गावाजवळ येताच मुख्य मार्गावरील खडयाने त्यांना घात केला.यात एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. रात्रीच्या सुमारास वढोली खराळपेठ मार्गादरम्यान हा अपघात घडला.

हेही वाचा - राणे फॅमिली सुसाईड मिस्ट्री: अजून एक ट्टिस्ट; मृत धीरजची आई अचानक प्रगटली .. केले हे गंभीर आरोप

गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे. दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही. त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध काल बुधवारी दि (२६) सायंकाळी ८ च्या सुमारास घडली. पवन नारायण चापले करंजी वय (३८) असे मृतक तर श्रिकृष्ण गेडाम वय (४०) बलरशाहा बामणी असे जखमीचे नाव आहे.

पवन व श्रीकृष्ण दोघेही परिवहन विभागात वाहनचालक असून कार्यालयीन कामाकरिता गडचिरोली आगार व्यवस्थापक यांच्याकडे गेले होते. वाहनचालक असून सुद्धा यांना e-paas शिवाय जिल्हा ओलांडायची परवानगी नाही. आष्टी पोलिसांनी e-paas शिवाय जाण्याकरिता परवानगी न दिल्याने आड मार्गाने शासकीय कामानिमित्य गडचिरोली गाठून काम पूर्ण करून येताना मूल खेडी मार्ग एका बाजूने खोदून असल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहनचालक असलेल्या पवनला मात्र जीव गमवावा लागला.

केवळ एक रुग्णवाहिका 

अपघातानंतर लगेच उपस्थितांनी रुग्णवाहिकेला फोन केला मात्र गोंडपीपरी रुग्णालयाला १०८ एकच रुग्णवाहिका असल्याने ती पोहचू शकली नाही अपघातानंतर तबल एक तास उशिरा गोंडपीपरी पोलिसांनी नागरिकांच्या  मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

असे का घडले? - मोठी बातमी: राणे प्रकरणात अचानक ट्विस्ट.. घटनेला अनैतिक संबंधाची किनार? ही माहिती आली समोर

मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करा

डॉकटरांनी पवनला मृत घोषित केले. जखमी गेडाम याला चंद्रपूर उपचाराकरिता रेफर करण्यात आले. गोंडपीपरी खेडी मार्गाच्या कंत्राटदारवार मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे. पुढील तपास ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात आर पानेकर, कोवे करत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two person change their way as the dont have epass and mate with an accident