दोन पोलिस कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : कुख्यात गुंड सिजो चंद्रन हा सुपर हॉस्पिटलमधून पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. या प्रकरणात सोमवारी पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम यांनी सुरक्षेत हलगर्जीपणा करणारे पोलिस कर्मचारी राजेंद्र ठवरे (ब. नं.13095) व कमलेश टेकाडे (ब. नं. 231) यांना निलंबित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सीजो चंद्रन उर्फ नडार उर्फ प्रिन्स (38 रा. नवी दिल्ली) हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. चार दिवसांपूर्वी सिजोची पत्नी भेटायला दवाखान्यात आली होती. सिजो हा डॉक्‍टरांना सुटी मागत होता. येथे उपचार चांगल्याप्रकारे होणार नसून मला हैदराबादला उपचार करायचे आहेत असे तो डॉक्‍टरांना म्हणत होता. परंतु, सिजो हा मध्यवर्ती कारागृहात उपचारासाठी आल्यानंतर डॉक्‍टरांनी त्याच्याकडे काहीच लक्ष दिले नव्हते. त्यामुळे त्याने पळ काढण्याचे ठरविले.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तो वॉर्ड क्र. 43च्या शौचालयात शौचासाठी गेला होता. त्यावेळी पोलिस कर्मचारी राजेंद्र ठवरे व कमलेश टेकाडे हे शौचालयाजवळच होते. मात्र, ते मोबाईलमध्ये मग्न होते. गर्दीचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवून सिजो पळून गेला. पळून जाताना त्याने उपचाराची फाइल सोबत नेली. कर्तव्यात कसूर केल्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांना दोषी ठरवित सोमवारी दुपारी निलंबित करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two policemen suspended