अमरावती "आयआयएमसी'चे दोन विद्यार्थी देशात तिसरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

अमरावती : भारतीय जनसंचार संस्था नवी दिल्लीद्वारा एप्रिल 2019 मध्ये घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात स्थानिक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) केंद्राच्या दोन विद्यार्थ्यांनी इंग्रजी तसेच भाषिक पत्रकारितेत देशभरातून तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

आयआयएमसीच्या अमरावती केंद्राच्या अरुणिमा शर्मा व नीतेश बावनकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे इंग्रजी व भाषिक पत्रकारिता अभ्यासक्रमात देशभरातून तिसरे स्थान प्राप्त करून केंद्राचा लौकिक वाढविला आहे. केंद्राचा निकाल 100 टक्के लागला आहे. अमरावती प्रादेशिक केंद्रात सत्र 2019-20 च्या इंग्रजी व मराठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या सत्रास प्रारंभ झाला असून त्याचे रीतसर उद्‌घाटन प्रादेशिक संचालक विजय सातोकर यांच्या हस्ते, प्रा. अनिल जाधव व प्रा. विनय सोनुले यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांचे "अमरावती विद्यापीठातील जैविक विविधता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामवंतांचे मार्गदर्शन लाभावे या उद्देशाने दरवर्षी व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. या शृंखलेत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांचे व्याख्यान सोमवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांचे व्याख्यान 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two students from IIMC students rank third