यवतमाळच्या दोन शिक्षकांची राज्य पुरस्कारासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील 107 शिक्षकांची निवड झाली असून त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून एक तर माध्यमिक शिक्षकांमधून एक अशी दोन शिक्षकांची निवड झाली आहे.

प्राथमिक विभागांमध्ये आसाराम झासू चव्हाण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरोडा (ता. आर्णी) यांची तर माध्यमिक विभागातून किशोर भास्करराव बनारसे मारोती पाटील विद्यालय, कवठा बाजार (ता. आर्णी) या दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना शिक्षकदिनी रंगशारदा बांद्रा मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते रोख 1 लाख रुपये देऊन राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two teachers from yavatmal district selected for state award