Tigers Death : जगप्रसिद्ध ताडोबात आढळले दोन वाघांचे शव, वन विभागात खळबळ

जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पंधरा वर्षाची वाघीण (T75) व सहा महिन्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला.
Tiger Death in Tadoba
Tiger Death in TadobaSakal

जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पंधरा वर्षाची वाघीण (T75) व सहा महिन्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. कुजलेल्या स्थितीत असलेल्या वाघिणीचे अवयव साबूत होते. वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचं वन विभागाचे म्हणणं आहे. इतर वाघाचा हल्ल्यात बसल्याच्या मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन अंतर्गत येणाऱ्या शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत T75 वाघिणीचे मृतदेह आढळून आला. या वाघिणीचा मृत्यू 20-२५ दिवसा अगोदर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतावस्थेतील वाघीण खूप दिवसापासून पडून होती. गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना ती दिसली.

दुसऱ्या घटनेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहूरली वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक १८९ मध्ये वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. मृत बछडा सहा ते सात महिन्याचा असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला. शावकाचा शरीरावर जखमा होत्या. नर वाघाचा हल्ल्यात बछडाच्या मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. हा शावक T ६० मादीचा होता. दरम्यान पुढील तपास वन विभाग करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com