Tiger : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दोन वाघ पकडले

नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दोन वाघ जेरबंद करण्यात आले.
Tiger
Tigersakal

गडचिरोली - नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दोन वाघ जेरबंद करण्यात आले आहेत. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनच्या कार्यक्रमांतर्गत या दोन्ही वाघांना वैद्यकीय तपासणीनंतर नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने वाघ आहेत. अभ्यासकांच्या मते वाघांची वाढती संख्या मानव-वन्यजीव संघर्षाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सहा वाघ नवेगाव-नागझिरा अभयारण्य तसेच जिथे वाघांची संख्या कमी आहे, अशा अभयारण्यात सोडण्याचा कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था तथा वनविभागाने तयार केला आहे.

Tiger
Crime News : धक्कादायक! महिला ऑटोचालकास शिविगाळ करत मारहाण; गुन्हा दाखल

हा कार्यक्रम प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा दोन वाघांना जेरबंद करण्यात आले. देसाईगंज (वडसा) वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या जंगलातील रामाळा बिट येथे मंगळवार (ता. १६) एक वाघ पकडण्यात आला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शिवणी-करवा वनपरिक्षेत्रात एक असे दोन वाघ जेरबंद करण्यात आले आहेत.

यातील शिवणी-करवा जंगलातील वाघ चंद्रपूर येथेच जेरबंद आहे. भारतीय वन्यजीव संस्थाचे अभ्यासक तथा पशुवैद्यकीय अधिकारी या दोन्ही वाघांची वैद्यकीय तपासणी करतील. वाघांची प्रकृती उत्तम असल्याची खातरजमा केल्यानंतर भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनचे अधिकारी वाघांना नागझिरा अभयारण्यात सोडण्याचा निर्णय घेतील. वाघ स्थलांतरणचा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था राबवित आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात हा संपूर्ण प्रकल्प सुरू आहे.

ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व त्यांच्या पथकाने या वाघांना जेरबंद केले. आरमोरी येथे जेरबंद केलेल्या वाघाचे नाव टी ४ असून त्याला मंगळवारी सकाळी ७. ३० वाजता जेरबंद करण्यात आले. तो ३ वर्षांचा असल्याची माहिती उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com