
दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुणांसह चिमुकलीचा मृत्यू
आर्णी (जि. यवतमाळ) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चिमुकलीसह दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर महिलेसह पुरुष गंभीर जखमी झाला. ही घटना आर्णीतील गॅस एजन्सी गोदामाजवळील उमरी रोडवर घडली. गजानन अशोक खेकाळे (२८, रा. उमरी) व राहुल रमेश कोडापे (२६, रा. उमरी), रेश्मा राजू पत्रे (वय चार, रा. देवगाव) अशी मृतांची नावे आहेत. (Two-wheeler head-on collision small girl dies along with two youths)
अंबादास बाबाराव खेकाळे (३२, रा. उमरी), देवका राजू पत्रे (३५) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. उमरी इजारा येथील गजानन खेकाळे हा दुचाकीने बहीण देवका व भाची रेश्मा यांना घेऊन आर्णी येथील रुग्णालयात येत होता.
आर्णीकडून उमरी इजारा येथे जाण्यासाठी राहुल भरधाव कोडापे जात होता. उमरी रोडवर दोन्ही दुचाकीत समोरासमोर धडक (Road accident) बसली. त्यात गजानन व राहुल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी रेश्माला उपचारासाठी यवतमाळातील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा: मधुचंद्रानंतर पत्नीने पतीला म्हटले नपुंसक; मग घडला हा प्रकार...
शवविच्छेदन केल्यावर मृतदेह (Death) नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडार, योगेश सुंकलवार, ऋषिकेश इंगळे यांनी केला. या प्रकरणी जमादार व्यंकटेश मच्छेवार यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
Web Title: Two Wheeler Head On Collision Small Girl Dies Along With Two Youths
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..